+91 8668544177
३, पहिला मजला, सिद्धी पार्क, पंडित कॉलनी, गंगापूर रोड, नाशिक.
shreemangal15@gmail.com
ऐशीच्या दशकात तत्कालीन मुख्यमंत्री मा.ना.वसंतदादा पाटील यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात उच्च व्यावसायिक शिक्षणासाठी खाजगी महाविद्यालये सुरु करण्यात आली. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्याचा चांगला फायदा होऊ लागला. या अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मोठ्या रकमेची गरज होती. नाशिकच्या माझ्या एका मित्राच्या मुलाने मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला होता. त्यासाठी त्याला द्यावी लागलेली मोठी रक्कम मला समजली आणि माझे डोके गरगरले....
अधिक वाचाश्री संताजी महाराज जगनाडे तेली समाजातील थोर संत व श्री तुकाराम महाराज यांचे संत -सांगाती
श्री ग्रुप फाऊंडेशन हि नाशिक शहर तेली समाजातील कार्यकर्त्यांनी स्थापन केलेली सामाजिक संस्था आहे.
श्री ग्रुप फाऊंडेशन, नाशिक, तर्फे सामाजिक घडामोडींवर माहिती देणारे मुखपत्र "श्री मंगल " नावाने प्रकाशित केले जाते.
ऐशीच्या दशकात तत्कालीन मुख्यमंत्री मा.ना.वसंतदादा पाटील यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात उच्च व्यावसायिक शिक्षणासाठी खाजगी महाविद्यालये सुरु करण्यात आली. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्याचा चांगला फायदा होऊ लागला. या अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मोठ्या रकमेची गरज होती. नाशिकच्या माझ्या एका मित्राच्या मुलाने मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला होता. त्यासाठी त्याला द्यावी लागलेली मोठी रक्कम मला समजली आणि माझे डोके गरगरले....
समाज प्रबोधन हे प्रत्येक वृत्तपत्राचे ध्येय असते. त्याचाच आदर्श डोळ्या समोर ठेवून जानेवारी २००१ पासून श्रीमंगल मासिकाचे प्रकाशन दरमहा ७ तारखेला करण्यात येते .त्यात समाजातील अनिष्ठ रूढी बंद करणे , विवाह व इतर सोहळ्यात “ आहेर “ देण्याची पद्धत बंद करणे , लग्न वेळेवर लावणे, विद्यार्थांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन करणे, प्रवासाची आवड निर्माण व्हावी म्हणून “प्रवास वर्णन” करणे आदी लेख प्रकाशित केले जातात.
समाजातील काही घटक असे आहे कि ,त्यांना आपल्या आयुष्याचा जोडीदार मिळवणे खूप कठीण होऊन बसले आहे.यात प्रामुख्याने अंध-अपंग ,मूक-बधीर ,विधवा-विदूर व घटस्फोटीत यांचा समावेश आहे. अशा दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार मिळवून देण्याचे सामाजिक कार्य श्रीग्रूप फाउंडेशन गेल्या ७ वर्षापासून करीत आहे. या माध्यमातून दरवर्षी १०० पेक्षा जास्त विवाह जमले आहेत.
५ सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या निमित्याने गुरूंचे पूजन करणे हि आपली संस्कृती आहे.याचा विचार करून ६ सप्टेंबर २०१५ रोजी नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक,माध्यमिक, उच्चमाध्यमिक व महाविद्यालयातील शिक्षक व प्राचार्यांचा सत्कार करण्यात आला,प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्राध्यापक सौ.देवयानी फरांदे , प्राचार्य जयंत पट्टीवार व नगर सेवक गजानन शेलार उपस्थित होते.
समाजाची मान अभिमानाने उंचावेल असा घटक म्हणजे डॉक्टर...! डॉक्टर हा समाजाचा अनमोल ठेवा आहे. त्यांच्या सेवाव्रती कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रीग्रुप फाउंडेशन तर्फे १ जुलै या डॉक्टर्स डे च्या निमित्ताने २ जुलै २०१७ रोजी डॉ.सौ.वैशाली सूर्यवंशी यांच्या साई योगा हॉल, इंदिरा नगर येथे धन्वंतरी अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.प्रमुख पाहुणे म्हणून ए.सी.पी.मा.श्री शांताराम अवसरे साहेब होते.नाशिक महानगर पालिका क्षेत्रातील सुमारे ९० डॉक्टरांचा स्मृतीचिन्ह,शाल-श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
श्रीग्रूप फाउंडेशन नेहमीच समाजासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत असते. नाशिक शहरातील विध्यार्थानी व त्यांच्या पालकांनी गणपती बनवण्याची कला आत्मसात करावी हे ध्येय ठेवून शुक्रवार १७ ऑगस्ट २०१८ रोजी संताजी हॉल, इंदिरा नगर येथे गणपती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते.या कार्यशाळेचे नियोजन अतिशय कमी वेळात करण्यात आले असले तरी भर पावसात १२५ पेक्षा जास्त कलासक्त विध्यार्थी व पालकांनी या उपक्रमात भाग घेतला.
श्री संताजी महाराज्यांच्या जयंती निमित्ताने श्रीग्रूप फाउंडेशन नाशिक संचालित संताजी श्री मंगल फार्मा फोरमची स्थापना रविवार दिनांक ८ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ठीक १० वाजता हॉटेल ऋषी , गोविंदनगर ,नाशिक येथे करण्यात आली.मान्यवरांच्या हस्ते संताजी महाराज्यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
आपल्या समाज्यातील कर्तुत्ववान महिलांच्या कर्तुत्वाला झळाळी यावी, कर्तुत्ववान सुवर्णाच कोंदण मिळव या ध्येयाने प्रेरित होऊन श्रीग्रुप फोउंडेशनने “ श्रीमंगल सखी मंचाची “ स्थापना केली. दिनांक २९/३/२०१८ रोजी पलुस्कर सभागृह, इंद्रकुंड,पंचवटी,नाशिक येथे सायं.६ वा. श्रीमंगल सखी मंचाचा पदग्रहण सोहळा दिमाखात साजरा झाला.
© 2024. ShreeGroup Foundation - All rights reserved!. Reg. No. 6592 Dt. 25.5.2000 - Maintained by I-Tech System