+91 9607174911
३, पहिला मजला, सिद्धी पार्क, पंडित कॉलनी, गंगापूर रोड, नाशिक.
shreemangal15@gmail.com
तेली समाजात होऊन गेलेले थोर संत. संताजी महाराज हे श्री. संत तुकाराम महाराजांचे संत सांगती. त्यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे तुकोबांच्या अभंगाचे त्यांनी केलेले लेखन आणि नंतर ठेव्याचे यावनी हल्ल्यापासून केलेले जतन. संताजी महाराज हे तुकोबांच्या परिवारात वावरणारे व त्यांची सेवा अखंडपणे जोपणारे संत. संताजी महाराजांचे वडील विठोबापंत जगनाडे व आई सुदुम्बरे येथील काळे घराण्यातील मथुबाई. संताजी महाराजांचे शिक्षण लिहिता वाचता येणे व हिशोब ठेवणे इतकेच होते. त्यांचे अक्षर फार सुंदर होते. घराची परिस्थीती चांगली होती. वयाच्या दहाव्या वर्षीच वडिलांनी संताजी महाराजांना तेल धंद्याचा परिचय करून दिला. संताजी महाराजाचे लग्न खेड येथील कहाणे घराण्यातील यमुनाबाई यांच्या बरोबर झाला. संताजी महाराजांची कीर्तन –प्रवचनांच्या श्रावणाने आणि घराच्या संस्कारांनी परमेश्वरावरील श्रद्धा अफाट होती. संताजी महाराजांची व तुकाराम महाराजांची भेट १६४० साली झाली. संताजी महाराजांनी तुकाराम महाराजान गुरुस्थानी मानले होते.
© 2020. ShreeGroup Foundation - All rights reserved!. Reg. No. 6592 Dt. 25.5.2000 - Developed by ISHA IT SERVICES