+91 8668544177
३, पहिला मजला, सिद्धी पार्क, पंडित कॉलनी, गंगापूर रोड, नाशिक.
shreemangal15@gmail.com
दि. ३० जुलै २०१५ नवीन संचालक मंडळाने सूत्रे हाती घेतल्यावर काही नवीन उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यात ५ सप्टेंबरच्या शिक्षकदिना निमित्त नाशिक जिल्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयातील शिक्षक मुख्याध्यापक, प्राध्यापक व प्राचार्य यांचा गुरुवंदन सोहळा रविवार दिनांक ६ सप्टेंबर २०१५ रोजी सकाळी ठीक १० वा. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या इंजिनिअरिंग कॉलेज हॉल मध्ये घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे, प्राचार्य जयंत पट्टीवार, नाशिक जिल्हा केमिस्ट असो. चे अध्यक्ष श्री. गोरखशेठ चौधरी त्रंबकेश्वरचे उपनगर अध्यक्ष श्री. संतोष कदम, भाजपचे युवा नेते श्री. विक्रांत चांदवडकर, श्री. गजानन शेलार, भगूरचे नगरसेवक श्री. संजय मधुकर शिंदे, जेष्ठ समाजसेवक श्री. संतोष नथू चौधरी, श्रीमंगल संपादक श्री. अशोक चौधरी हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. एम. जाधव हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सौ. वैशाली चौधरी यांनी केले. फाउंडेशनच्या कार्याचा आढावा जी. एम. जाधव यांनी घेतला. आभार अशोक चौधरी यांनी मांडले. कार्यक्रमास जिल्हातून २०० पेक्षा जास्त शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, व प्राचार्य होते. त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. श्रीग्रूप फाउंडेशनच्या वेबसाईटचे अधिकृत उदघाटन या कार्यक्रमात प्राचार्य जयंत पट्टीवार व आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष संपतराव व्यवहारे, उपाध्यक्ष महाले, शिंदे, सरचिटणीस श्री. सुधाकर देसाई, चिटणीस श्री. मधुकर वालझाडे, खजिनदार अरुणतात्या चांदवडकर, संचालक सर्वश्री सुरेश काळे, प्रा. वैशाली चौधरी प्रा. सौ. प्रतिभा चौधरी किरण वालझाडे, राजेंद्र बाबुराव चौधरी, शरद किसनराव वालझाडे, महेश, अशोक गोविंद वालझाडे, विजय काशिनाथ जाधव, मनोहर बारगजे, शरद नारायण चौधरी, सौ. शैला दत्ता नेरकर, सौ. संगिता महेंद्र चौधरी, सौ. योगिता क्षीरसागर आदींनी परिश्रम घेतले. ...
© 2024. ShreeGroup Foundation - All rights reserved!. Reg. No. 6592 Dt. 25.5.2000 - Maintained by I-Tech System