+91 8668544177

३, पहिला मजला, सिद्धी पार्क, पंडित कॉलनी, गंगापूर रोड, नाशिक.

   shreemangal15@gmail.com

श्रीमंगल सखी मंच

दि. ३० जुलै २०१५ नवीन संचालक मंडळाने सूत्रे हाती घेतल्यावर काही नवीन उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यात ५ सप्टेंबरच्या शिक्षकदिना निमित्त नाशिक जिल्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयातील शिक्षक मुख्याध्यापक, प्राध्यापक व प्राचार्य यांचा गुरुवंदन सोहळा रविवार दिनांक ६ सप्टेंबर २०१५ रोजी सकाळी ठीक १० वा. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या इंजिनिअरिंग कॉलेज हॉल मध्ये घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे, प्राचार्य जयंत पट्टीवार, नाशिक जिल्हा केमिस्ट असो. चे अध्यक्ष श्री. गोरखशेठ चौधरी त्रंबकेश्वरचे उपनगर अध्यक्ष श्री. संतोष कदम, भाजपचे युवा नेते श्री. विक्रांत चांदवडकर, श्री. गजानन शेलार, भगूरचे नगरसेवक श्री. संजय मधुकर शिंदे, जेष्ठ समाजसेवक श्री. संतोष नथू चौधरी, श्रीमंगल संपादक श्री. अशोक चौधरी हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. एम. जाधव हे होते.

मागील कार्यक्रम