+91 8668544177

३, पहिला मजला, सिद्धी पार्क, पंडित कॉलनी, गंगापूर रोड, नाशिक.

   shreemangal15@gmail.com

गणपती कार्यशाळा

सुप्त कलागुणांना वाव देणारी गणपती कार्यशाळा... भारतीय संस्कृतीमध्ये ६४ कलांना प्रतिष्ठा देण्यात आली आहे. या ६४ कलागुणांपैकी आपल्याला आवडतील त्या काही कलांची जोपासना प्रत्येक व्यक्तीने करणे आवश्यक आहे. कारण या कलांचा आस्वाद घेताना आपले जीवन स्वस्थ व निरोगी राहण्यास मदत होते. मन स्वस्थ असेल, आनंदी असेल तर शरीर आपोआपच निरोगी राहते. म्हणून मनाच्या या आनंददायी प्रक्रियेसाठी ह्या ६४ कलांपैकी कुठल्याही कलेची संगत असणं हेच निरोगीपणाच औषध आहे. या ६४ कलागुणांपैकी प्रत्येकाच्या मनात कुठल्या तरी कलेविषयी मुळातच आसक्ती असते. पण ती दाखविण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी त्याला योग्य संधी उपलब्ध होत नाही. म्हणून ती असलेली कला मनामध्ये सुप्त पद्धतीने वावरत असते. मात्र लहान मुलां ध्ये ती व्यक्त करण्याची इच्छा प्रखरतेने होत असते. त्यांना योग्य संधी हवी असते. श्रीग्रुप फाऊंडेशन नेहमीच समाजासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत असते. यावर्षी नाशिक शहरातील विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी गणपती बनविण्याची कला आत्मसात करावी हे ध्येय ठेवून शुक्रवार १७ ऑगस्ट २०१८ रोजी संताजी हॉल, इंदिरा नगर येथे गणपती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे नियोजन अतिशय कमी वेळात करण्यात आले असले तरी भर पावसात १२५ पेक्षा जास्त कलासक्त विद्यार्थी व पालकांनी या उपक्रमात भाग घेतला.

मागील कार्यक्रम